चौकोन

सोडवलेली उदाहरणे

views

3:33
आता आपण समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मांवर आधारित उदाहरणे सोडवू. उदा1) PQRS हा समांतरभूज चौकोन आहे. यात PQ=3.5, PS=5.3 ∠Q= 50० आहे. तर PQRS च्या इतर बाजूंच्या लांबी आणि कोनांची मापे काढा. उकल: PQRS हा समांतरभूज चौकोन आहे. ∴∠Q+∠P= 180० ∴ 50० + ∠P =180० ∴ ∠P = 180० - 50०= 130० आता ∠P = ∠R आणि ∠Q = ∠S आहे ∴ ∠R = 130० आणि ∠S = 50० तसेच, PS = QR आणि PQ =SR ∴ QR=5.3 आणि SR=3.5 आहे.