चौकोन

समांतर रेषांच्या कसोटया

views

4:20
आता आपण समांतर रेषांच्या कसोट्यांची उजळणी करूया. 1)जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात. या आकृतीत रेषा l व रेषा m या दोन रेषा असून त्यांची छेदिका PQ आहे. यातील ∠‍‍X≅ ∠Yआहेत. कारण ते छेदिकेने तयार झालेले संगत कोन आहेत. ∴ रेषा l ∥ रेषा m आहे. 2) जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात. आकृतीमध्ये रेषा l व रेषा m या दोन रेषा असून त्यांची छेदिका NO आहे. यातील ∠‍‍P≅ ∠Q आहेत.कारण ते छेदिकेने तयार झालेले व्युत्क्रम कोन आहेत. ∴रेषाl ∥ रेषा m आहे. 3) जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता आतंरकोनांची एक जोडी पूरक असेल, तर त्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. आकृतीमध्ये रेषा l व रेषा m या दोन रेषा असून त्यांची छेदिका PQ आहे.. यातील∠t≅ ∠u आहेत.कारण ते छेदिकेने तयार झालेले आंतर कोन आहेत.∴रेषाl ∥ रेषा m आहे.