चौकोन

सोडवलेली उदाहरणे

views

3:27
आता आपण काही उदाहरणांचा सराव करूया. उदा3) कोणताही समभूज चौकोन हा समांतरभूज असतो हे सिद्ध करा. (page ६६ आकृती 5.21) पक्ष : ABCD हा समभूज चौकोन आहे. साध्य: ABCD हा समांतरभूज आहे. सिद्धता: बाजू AB = बाजू BC = बाजू CD = बाजू DA------------(पक्ष) ∴ बाजू AB = बाजू CD आणि बाजू BC = बाजू CD आहे. ∴ ABCD हा समांतरभूज आहे------(समांतरभूज चौकोनाची संमुख भुजा कसोटी) मुलांनो, हे लक्षात ठेवा की, कोणताही समभूज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो पण कोणताही समांतरभुज चौकोन हा समभूज चौकोन असेलच असे नाही.