चौकोन

आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म

views

6:05
आयत, समभूज चौकोन आणि चौरस हे समांतर भूज चौकोनही असतात. त्यामुळे संमुख बाजू समान असणे, संगत कोन समान असणे आणि कर्ण परस्परांना दुभागणे हे गुणधर्म या तिन्ही प्रकारच्या चौकोनात असतात. परंतु यापेक्षा काही अधिक गुणधर्म या चौकोनात असतात. कोणते ते आपण पुढील प्रमेयांच्या मदतीने समजून घेऊ. प्रमेय 1: आयताचे कर्ण एकरूप असतात. मुलांनो आकृतीवरून दिलेले प्रमेय सिद्ध करूया. पक्ष: ABCD हा आयत आहे. साध्य: कर्ण AC ≅ कर्ण BD. रचना: आयताचे सर्व कोन काटकोन असतात. सिद्धता: मुलांनो, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात त्यामुळे तयार होणारे त्रिकोण खालीलप्रमाणे एकरूप दाखविता येतील. ∴∆ADC व ∆ DAB मध्ये, बाजू AB ≅ बाजू DC आहे ..............(आयताच्या संमुख बाजू) ∠ ADC ≅∠ DAB आहे ..............(प्रत्येकी 900) बाजू AD ≅ बाजू DA ..........(सामाईक बाजू) ∴∆ ADC ≅ ∆ DAB आहे ...............(बाकोबा कसोटी.) कर्ण AC ≅ कर्ण BD आहे .............(एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू.).