चौकोन

समलंब चौकोन

views

4:34
ज्या चौकोनाची संमुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात.या आकृतीत पहा. यातील चौकोन ABCD मध्ये फक्त बाजू AB आणि बाजू DC याच बाजू एकमेकींना समांतर आहेत. म्हणून हा समलंब चौकोन आहे. समांतर रेषांच्या गुणाधार्मांनुसार ∠A + ∠D = 1800. म्हणजे या लगतच्या कोनांची जोडी पूरक आहे. तसेच ∠B + ∠C = 1800 आहे. म्हणजे ही जोडी सुद्धा पूरक आहे.. यावरून समलंब चौकोनात लगतच्या कोनाच्या दोन जोडया पूरक असतात. समद्विभुज समलंब चौकोन: व्याख्या: समलंब चौकोनाच्या समांतर नसलेल्या बाजूंची जोडी एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभूज समलंब चौकोन म्हणतात.