दोन चलांतील रेषीय समीकरणे

दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख

views

4:14
आता आपण दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख कसा काढतात हे पाहूया. दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख ही एक सरळ रेषा असते. जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करते ती जोडी त्या समीकरणाची उकल असते. तसेच ती क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरील बिंदू दर्शवते. उदाहरण 1) 2 x-γ =4 या समीकरणाचा आलेख काढू. उकल: मुलांनो, या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी ( x,γ) च्या 4 क्रमित जोड्या मिळवूया त्यासाठी x व γ च्या किंमती गृहित धराव्या लागतील. क्रमित जोडी मिळवताना x व γ च्या किंमती शून्य घेणे सोईचे ठरेल. उदाहरण 2) 0 x+ γ =2 हे समीकरण सोईसाठी γ =2 असे लिहितात. या समीकरणाचा आलेख x अक्षाला समांतर असतो. कारण x चा निर्देशक कोणताही घेतला तरी γ चा निर्देशक 2 हाच असतो. तसेच x+0 γ =2 हे समीकरण x=2 असे लिहितात व त्याचा आलेख γ अक्षाला समांतर असतो.