सजीवांमधील जीवनक्रिया

प्रस्तावना

views

04:11
जे हालचाल करतात, ज्यांना अन्न, हवा, पाणी यांची जीवन जगण्यासाठी गरज भासते, त्यांना सजीव असे म्हणतात. आपण ग्रहण केलेले अन्न पचन होणे गरजेचे असते. हे ग्रहण केलेले अन्न पचन होण्यासाठी सजीवांमध्ये विविध प्रकारच्या पचनसंस्था असतात. तसेच हवेसाठी श्वसनसंस्थाही असतात. आता मला सांगा पचनसंस्था व श्वसनसंस्था यांचे कार्य कसे चालते? पचनसंस्था अन्नाच्या जटील पदार्थांचे शरीरात शोषण होण्याकरिता त्यांचे विद्राव्य पदार्थांत रूपांतर करते. हे सर्व विकरांच्या मदतीने घडते. विद्राव्य पोषक द्रव्ये रक्ताद्वारे सर्व पेशींपर्यंत पोहोचवली जातात. श्वसनसंस्थेमधील फुप्फुसांत ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो व रक्ताभिसरणाने प्रत्येक पेशीपर्यंत पोहचवला जातो. या पचनसंस्थेचे व श्वसनसंस्थेचे कार्य मेंदूच्या नियंत्रणाखाली असते आणि दोन्ही संस्थांच्या कार्यात समन्वय असतो. तर आपण या पाठामध्ये वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यामध्ये असणाऱ्या विविध संस्थांविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परिवहन म्हणजे काय, ते समजून घेऊ.