सजीवांमधील जीवनक्रिया

मानवामधील उत्सर्जन

views

05:38
आपण शरीराच्या वाढीसाठी अन्न खातो. अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. या अन्नातील आवश्यक ते अन्न आपल्या शरीरात पचते व अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकले जातात. आपल्या शरीरात अमोनिया, युरिआ, युरिक आम्ल, क्रिएटिन असे टाकाऊ पदार्थ चयापचय क्रियेतून तयार होतात. नाकावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. तर आहारातून पोटात गेलेली आणि आपल्या शरीराला आवश्यक नसलेली अतिरिक्त जीवनसत्त्वे, क्षार असे पदार्थ मूत्रावाटे शरीराच्या बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरात उत्सर्जन क्रिया पार पडण्यासाठी वृक्कांमधून रक्त गाळले जाते. तर फुफ्फुसांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो आणि ऑक्सिजन आत घेतला जातो. त्वचेवरील धर्मग्रंथीतून काही प्रमाणात उत्सर्जित पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात. शरीरातून नको असलेले पदार्थ घामावाटे शरीराच्या बाहेर टाकले जातात. तसेच गुदद्वारातून बहि:क्षेपण क्रियेने न पचलेले अन्न व चोथा शरीराबाहेर टाकले जाते. अशा रीतीने नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.