सजीवांमधील जीवनक्रिया

परिघीय चेतासंस्था

views

03:53
मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात. या चेतासंस्थेतील चेता दोन प्रकारच्या असतात: कर्परचेता आणि मेरूचेता. यांची आपण माहिती घेऊ. कर्परचेता: मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्परचेतांच्या 12 जोड्या असतात. या जोड्या शिर, छाती, व पोटातील विविध भागांशी संलग्नित असतात. यात सेन्सरी न्यूरॉन्स असतात. मेरूरचेता: मेरुरज्जूपासून निघणाऱ्या मेरूचेतांच्या 31 जोड्या असतात. या जोड्या हात-पाय, त्वचा व शरीराच्या इतर भागाशी संलग्नित असतात. स्वायत्त चेतासंस्था: आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवांतील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. याचे नियंत्रण आपल्या इच्छेनुसार असत नाही. प्रतिक्षिप्त क्रिया: तुम्ही बोलत असताना अचानक तुमच्या दिशेने चेंडू आला की तुम्ही जागेवरून हलता. अशा घटनांना आपण काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रक्रियेवर कोणाचेही नियंत्रण नसते. अशा क्रियांना ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ असे म्हणतात. प्रतिक्षिप्त क्रिया ही मेंदूशिवाय नियंत्रण आणि समन्वय ठेवणारी क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय.