सजीवांमधील जीवनक्रिया

रक्त व्याश्लेषण

views

04:18
तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या रुग्णाला ‘डायलेसिस’ वर ठेवले असे ऐकले असेल. या डायलेसिसलाच ‘रक्त व्याश्लेषण’ असे म्हणतात. दुखापतीमुळे, संसर्गामुळे किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाला तर वृक्काची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे विषारी द्रव्य शरीरात जास्त प्रमाणात साठले जाते आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. वृक्क निकामी झाले तर कृत्रिम उपकरणांचा वापर करून रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. या उपकरणाच्या मदतीने 500 मिली इतके रक्त पाठवले जाते व ते रक्त शुद्ध करून पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते. उन्हाळ्यामध्ये पावसाळा व हिवाळ्यापेक्षा मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते. असे का होते? उन्हाळ्यात हवेचे तापमान जास्त असते त्यामुळे घाम येतो. तर पावसाळ्यात व हिवाळ्यात तापमान कमी असते म्हणून घाम कमी येतो. शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी घाम येतो. त्यामुळे मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते. तुम्हाला माहीत असेल की प्रौढ व्यक्तींमध्ये मूत्रविसर्जनाची क्रिया नियंत्रणात असते. परंतु काही लहान मुलांमध्ये ही क्रिया नियंत्रणात नसते. असे होते कारण वृक्कामध्ये मूत्र तयार होऊन ते व मूत्राशयात ते साठवले जाते. मूत्राशय हे स्नायुक्षम असून ते ऐच्छिक चेतांच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे मूत्राशय भरले की मूत्रविसर्जनाची इच्छा होते. परंतु लहान मुलांत ही क्रिया विकसित झालेली नसते. म्हणून लहान मुलांमध्ये ही क्रिया नियंत्रणात नसते.