सजीवांमधील जीवनक्रिया

मानवी चेतासंस्था

views

05:49
मानवी चेतासंस्था ही तीन भागांत विभागली आहे: मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. आकृतीत दाखवल्याप्रमाणे मानवी सांगाड्याचा वरील भाग हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा तर त्याखालील भाग हा परिघीय चेतासंस्थेचा आहे. तर काही चेतासंस्था ह्या स्वतंत्र कार्य करत असतात त्यांना स्वायत्त चेतासंस्था असे म्हणतात. आता आपण या चेतासंस्थेविषयी विस्ताराने माहिती घेऊ. मध्यवर्ती चेतासंस्था: मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरूरज्जू यांनी बनलेली असते. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा भाग आहे की, जो शरीराच्या बऱ्याच क्रियांवर नियंत्रण ठेवतो. मेंदू डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्परेमध्ये संरक्षित असतो. मेरूरज्जूला कशेरूस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षण असते. चेतासंस्था व त्यावरील अस्थी यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी आवरणे ही मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना ‘मस्तिष्क निलये’ म्हणतात. तर मेरूरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात. मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरूद्रव असतो. हा द्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवतो. तसेच आघातांपासून तिचे संरक्षणही करतो. ही आकृती पाहा, या आकृतीत मेंदूची रचना दिली आहे.