सजीवांमधील जीवनक्रिया

वनस्पतींमधील समन्वय

views

04:44
प्राण्यांमध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायू संस्था यांसारख्या संस्था वनस्पतींमध्ये नसतात. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की नेमकी वनस्पतींची हालचाल कशी होते? तर वनस्पतींमधील हालचाल ही उद्दीपनाला प्रतिसाद देण्याच्या स्वरूपात असते. बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ: यात विशिष्ट रसायनांना वनस्पतीने दिलेला प्रतिसाद आहे. आणि म्हणून परागनलिकेची वाढ ही बिजांडाच्या दिशेने झालेली दिसून येते. प्रकाशानुवर्ती हालचाल कोणतीही वनस्पती प्रकाश उद्दीपनाला प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाशाच्या दिशेने तिची वाढ होते. म्हणून जरी कुंडी आडवी ठेवली तरी वाढणारे रोप मात्र प्रकाशाच्या दिशेनेच वाढलेले दिसते. वनस्पतींची मुळे ही गुरुत्वाकर्षण आणि पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देतात. या प्रतिसादाला गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल म्हणतात. ज्या वेलींना आधाराची गरज असते त्या वेली तणावांच्या साहाय्याने आधार घेत वाढतात. वेलींचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात. ही आधारानुवर्ती हालचाल होय.