सजीवांमधील जीवनक्रिया

वनस्पतींमधील पाण्याचे वहन

views

03:55
मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात. या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. आता आपण एक कृती करूया. यासाठी तेरडा किंवा गुलछडी यासारखी लहान वनस्पती तिच्या मुळासह घ्या. (15.1 मूलदाब) तिची मुळे स्वच्छ धुवून घ्या. ती सॅफ्रानीन किंवा इओसीन यासारखे रंगद्रव्य घातलेल्या पाण्यात ठेवा. 2 ते 3 तास वनस्पती या पाण्यात तशीच ठेवा. आता 2 ते 3 तासानंतर या वनस्पतीमध्ये काय फरक जाणवला? हे रंगीत पाणी मूलदाबामुळे वर चढले आहे. मूलदाबामुळे हे रंगीत पाणी वर चढते. मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. संहतीमध्ये फरक असल्यामुळे पाणी आणि खनिजे जमिनीच्या मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात. त्यामुळे पेशी ताठर बनतात आणि लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात. मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळातील जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात आणि पुढे – पुढे ढकलली जातात. या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन सातत्याने पुढे ढकलला जातो. म्हणून अशा दाबामुळे झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढत जाते.