सजीवांमधील जीवनक्रिया

मानवातील समन्वय

views

06:02
तुम्ही शाळेच्या पटांगणावर, किंवा टीव्हीवर खेळाडूंना खेळताना पाहता. त्यावेळेस खेळाडूंच्या हालचालींमध्ये नियंत्रण व समन्वय तुम्हाला दिसून येतो. मानवी शरीरामध्ये एकाचवेळी अनेक क्रिया घडून येत असतात. त्या क्रियांमध्ये योग्यप्रकारे व परिणामकारकरीत्या समन्वय व नियंत्रण करणे गरजेचे असते. हे नियंत्रण दोन यंत्रणांद्वारे केले जाते. ते म्हणजे चेतानियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण. सर्वप्रथम आपण चेतानियंत्रणाची माहिती घेऊ. चेतानियंत्रण: पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता मानवामध्ये चेतानियंत्रणाद्वारे निर्माण होते. पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने मानवी शरीरात ‘आवेग’ निर्माण होतात. याच आवेगांना योग्य असा प्रतिसाद देण्याचे कार्य चेतासंस्था करते. अनेक चेतापेशी मिळून चेतासंस्था बनते. मानवासारख्या बहुपेशीय प्राण्यामध्ये आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेतासंस्थेसारखी यंत्रणा कार्यरत असते. हे नियंत्रण शरीरातील विशेष प्रकारच्या पेशीद्वारे केले जाते. या पेशींनाच चेतापेशी असे म्हणतात. मात्र अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था कार्यरत नसते. चेतापेशी: चेतापेशी हा चेतासंस्थेतील महत्त्वाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. ‘शरीरातील एका ठिकाणापासूनचे संदेश दुसऱ्या ठिकाणापर्यंत वहन करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. चेतापेशींची लांबी काही मीटरपर्यंत असते. चेतापेशीमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी व चेताबंध यांच्या मदतीने चेता बनतात.