सजीवांमधील जीवनक्रिया

रासायनिक नियंत्रण

views

03:17
आपल्या शरीरात अनेक अंत:स्रावी ग्रंथी आहेत. या ग्रंथींमार्फत शरीराच्या आत विविध गोष्टींचे वहन केले जाते. त्यामुळे आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फत देखील समन्वय व नियंत्रण केले जाते. अंतस्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात या ग्रंथींना ‘वाहिनी विरहित ग्रंथी’ असेही म्हणतात. या ग्रंथीकडे स्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होताच सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. या अंतस्रावी ग्रंथी शरीरात जरी ठराविक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्तामार्फत सर्व भागात पोहोचतात. अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वय राखण्याचे काम करतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात. या दोन संस्थांतील महत्त्व्वाचा फरक म्हणजे चेता आवेग हे जलद आणि कमी कालावधीसाठीच असतात, तर संप्रेरकांकडून होणारी क्रिया खूप धीम्या गतीने होते. मात्र ती दीर्घकाळ टिकणारी असते.