अर्थनियोजन

प्रस्तावना

views

02:58
आजच्या युगात कोणत्याही गोष्टीचे नियोजन असल्याखेरीज ते कार्य यशस्वी होत नसते. दैनंदिन जीवनात आपल्याला विविध गरजा असतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. परंतु त्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, काही पैशांची बचत व्हावी यासाठी आपल्याला अर्थनियोजन करणे आवश्यक असते. या अर्थनियोजनाचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते. आवश्यक गरजा पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आपण “बचत” करणे किंवा Saving असे म्हणतो. ही बचत सुरक्षित राहून तिच्यात वाढ होण्यासाठी ती आपण ठेव म्हणून ठेवतो किंवा जमीन, घर, यांसारख्या स्थावर बाबी खरेदी करतो. यालाच गुंतवणूक करणे असे म्हणतात. प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो व उरलेल्या रकमेची बचत करतो. तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो. याला “अर्थनियोजन” म्हणतात.