अर्थनियोजन

उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे आयकराचे दर दाखवणाऱ्या सारण्या

views

03:44
आयकराचे दर दर्शविण्यासाठी काही सारणींचा उपयोग होत असतो. करदात्याच्या वयोमानुसार त्या सारणीचा उपयोग होत असतो. मेहता यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपये आहे. त्यांनी उत्पन्नातून वजावट मिळणारी कोणतीही बचत केली नाही. तर त्यांचे करपात्र उत्पन्न कोणत्या टप्प्यात बसेल? दुसऱ्या टप्प्यात त्यांना किती रकमेवर किती टक्के दराने आयकर भरावा लागेल? करपात्र उत्पन्न वजा अडीच लाखावर 5% आयकर भरावा लागेल. म्हणजेच त्यांचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 250000 पेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यावर कर भरावा लागेल. मेहता यांचे वार्षिक उत्पन्न 4,50,000 आहे तर 2,50,000 पेक्षा 2,00,000 रुपये जास्त आहे. म्हणजेच त्यांना 2,00,000 वर 5% कर भरावा लागेल. उपकर किती रकमेवर आकारला जाईल. उपकर हा 3% (2% + 1%) होईल. तो 5% ने जी रक्कम येईल त्यावर आकारला जाईल, जसे 2,00,000 च्या 5% 10,000 येतात. तर 10,000 वर 3% उपकर असेल. याच पद्धतीने जसे तुमचे उत्पन्न वाढेल. तसा तुम्हांला आयकर (tax) व त्यावर उपकर भरावा लागेल.