अर्थनियोजन

गुंतवणूक

views

02:36
गुंतवणूक म्हणजे अशी प्रक्रिया की, ज्यामुळे आपली बचत आपल्याला परतावा मिळवून देण्याचे काम करेल. किंवा अशी गोष्ट करणे की, ज्यामुळे आपली बचत आपल्याला एवढा परतावा देईल की जो महागाई निर्देशांकापेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे आपल्या बचतीची क्रयशक्ती कमी होणार नाही. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. गुंतवणूकदार बँक, पोस्ट अशा आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थेमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण तेथे पैशांची सुरक्षितता जास्त असते. शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यात थोडी जोखीम असते. कारण ज्या उद्योगात हे पैसे गुंतवले जातात त्या उद्योगास तोटा झाल्यास गुंतवलेली रक्कम कमी होते. याउलट फायदा झाल्यास ती सुरक्षित राहते आणि आपल्याला लाभांश मिळू शकतो. गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना दोन मुख्य बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे जोखीम व दुसरी म्हणजे लाभ. अधिक जोखिम पत्करून गुंतवणूकदार आधिक लाभ मिळवू शकतो. परंतु अधिक जोखीम असल्यामुळे तोटाही होऊ शकतो. उदाहरणार्थ. शेअर्स मार्केट