अर्थनियोजन

कर आकारणी

views

05:47
कर म्हणजे शासनाला सेवा पुरवण्यासाठी देण्याचा एक मोबदला होय. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर, आयकर, महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. 1 जुलै 2017 पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरु करण्यात आली. त्याला आपण GST म्हणून ओळखतो. राष्ट्राच्या उभारणीसाठी शासन विविध योजना आखत असते. या योजनांच्या कार्यवाहीसाठी शासनाला फार मोठ्या रकमेची गरज असते. अनेक प्रकारच्या करांची आकारणी करून ही रक्कम उभी केली जाते. कराची उपयुक्तता काय असते ते आता आपण पाहू. 1) पायाभूत सुविधा पुरवणे. 2) विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे. 3) वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकास कामे आणि संशोधन याबाबत योजना राबवणे. 4) कायदा आणि सुव्यवस्था राखणे. 5) नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित लोकांना मदत करणे. 6) राष्ट्राचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे इत्यादी.