अर्थनियोजन

बचत

views

02:55
बचत म्हणजे तुमचे सर्व खर्च व देणी देऊन झाल्यावर उरलेली रक्कम म्हणजेच जे पैसे तुम्ही वाचवता ते म्हणजे बचत होय. 1) बचत सुरक्षित राहणे व तिच्यात वाढ होणे हिताचे असते. आपली बचत केलेली रक्कम बँकेत किंवा पोस्टात सुरक्षित राहते. बँकेतील बचत खात्यात पैसे जमा झाल्यामुळे रोकडरहित (Cashless) (कॅशलेस) व्यवहार करणे सोईचे होते. अशा व्यवहारामुळे आपल्याला स्वतःजवळ अधिक रक्कम ठेवावी लागत नाही व ती रक्कम हरवण्याची व चोरीला जाण्याची भीती नसते. 2) आपण केलेली बचत रोख स्वरूपात असेल आणि तिची गुंतवणूक न करता ती तशीच ठेवली तर, तिचे मूल्य काळाबरोबर कमी होते. म्हणजेच वस्तू विकत घेण्याची त्या रकमेची शक्ती कमी होते. म्हणजे पैशाची क्रयशक्ती कमी होते. यासाठी बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ होणे आवश्यक आहे. क्रयशक्ती = खरेदी करण्याची क्षमता. तुम्हांला माहीत असेल की मोठी माणसे नेहमी महागाई वाढली असे म्हणत असतात.