अर्थनियोजन

कायम खाते क्रमांक (PAN) Permanent Account Number

views

03:58
हल्ली तुम्ही PAN Card number हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. पॅन कार्ड हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे. भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून देखील मान्य केला जातो. अनेक महत्वाच्या कागदपत्रात आणि आर्थिक व्यवहारात हा क्रमांक नमूद करणे आवश्यक असते. पॅनकार्डचा उपयोग: आयकर विभागाकडे करभरणा करण्यासाठीचे चलन, करविवरणपत्र, (रिटर्नचा फॉर्म) इतर पत्रव्यवहार यावर पॅन क्रमांक लिहणे बंधनकारक असते. तसेच मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन नोंदवावा लागतो. अनेक वेळा ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्डचा उपयोग होतो. कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी ५०,००० इतकी किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करताना पॅनकार्ड अनिवार्य आहे. आयकराची आकारणी उत्पन्नावर होत असल्यामूळे उत्पन्नाचे विविध स्रोत जाणणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे मूख्य पाच स्रोत आहेत. 1)पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न. २)घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न. ३)धंदा आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न. ४)भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न. ५)इतर स्रोतांतून मिळणारे उत्पन्न.