निर्देशक भूमिती

रेषेचा चढ

views

05:24
मुलांनो, आपण सपाट जमिनीवर चालतो, तेव्हा श्रम करावे लागत नाहीत. मात्र चढावर चढताना थोडे श्रम करावे लागतात, माणसाला दम लागू शकतो. कारण चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे लागते, हे आपण विज्ञानात पाहिले आहे. प्रतलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. खाली दिलेल्या कृतीतून ही संकल्पना समजून घेऊ.