उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

जरा डोके चालवा

views

5:12
मीठ व तेल ही नैसर्गिक परिरक्षके आहेत. बरणीला आतून मीठ लावले तर बुरशी वाढू शकत नाही. तेलामुळे लोणचे हवेच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे हवेतील कवकांचे जीवाणू लोणच्यात शिरू शकत नाहीत. त्यामुळे लोणचे जास्त काळ टिकून राहते. विकतचे खाद्यपदार्थ या मध्ये सोडिअम नायट्रेट, सल्फाईट, मोनो सोडिअम गुल्हामेट, म्हणजेच अजिनोमोटो, सोडियम बेन्झोएट, BHT व BHA अशी विविध रासायनिक परिरक्षके मिसळवतात. यामुळे असे खाद्यपदार्थ जास्त काळ टिकून राहतात. परंतु अशी खाद्यपदार्थ विकत घेताना ज्यांच्या वेष्टणावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख छापलेली असेल असेच पदार्थ विकत घ्यावे.तारीख संपलेले पदार्थ खाल्ले तर आरोग्याला धोका पोहोचतो. परिणामी आपण आजारी पडू शकतो. असे पदार्थ आपण खाल्ले तर आरोग्याचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय आपले पैसे फुकट जातात. एखाद्या वेळेस आपला जीवही जाऊ शकतो.