उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

रायझोबिअम

views

4:00
नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबिअम जीवाणू खूप महत्त्वाची मदत करतात. रायझोबिअम जीवाणू हे वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये आढळून येतात. गुलाबी दांडयाप्रमाणे दिसणारे जीव म्हणजेच रायझोबिअम जीवाणू आहेत. मुलांनो, रायझोबिअमचे जीवाणू पाहण्यासाठी आपण कडधान्यावरील मुळांच्या गाठीचा वापर केला. अशा वनस्पतींना रायझोबिअम जीवाणूंचा खूप उपयोग होतो. रायझोबिअम जीवाणूंनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळेच डाळी, कडधान्य यांतील प्रथिनांचे प्रमाण उत्कृष्ट होते. आता आपण रायझोबिअमची भूमिका आणि महत्व समजून घेऊ या. रायझोबिअम हा जीवाणू वाटाणा, घेवडा, सोयाबीन अशा शिंबावर्गीय वनस्पतींसोबत सहजीवनात राहतो. या रोपट्याच्या मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्रस, नायट्राईटस व अमिनो आम्ले पुरवतात आणि त्या बदल्यात त्या रोपट्याकडून कर्बोदकाच्या स्वरूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारच्या परस्परांच्या फायद्याच्या ठरणाऱ्या नात्याला आपण सहजीवन असे म्हणतो. रायझोबिया, हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात पण या नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा किंवा इतर काही कडधान्यांच्या रोपांची गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळेच डाळी, कडधान्ये हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत ठरतात. तसेच ही संयुगे मातीत मिसळली गेल्यामुळे माती सुपीक बनते. त्यामुळे रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळता येतात. अलीकडील काळात रोपट्याला लागवडीपूर्वी रायझोबिअम लसी दिल्या जातात. किंवा बियाणांना रायझोबिआयुक्त द्रव किंवा पावडर लावण्यात येते. त्यामुळे हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. या पद्धतीलाच ‘लसीकरण’ असे म्हणतात.