उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

पेनिसिलीन

views

2:32
पेनिसिलीन हे प्रतिजैविक पेनिसिलिअम कवकापासून मिळते. स्टॅफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिआ, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी पेनिसिलीन हे प्रतिजैविक वापरतात. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमूळे होणारे संसर्ग पेनिसिलीनमुळे रोखले जातात. तसेच न्यूमोनिआ, स्कार्लेट फीवर (लोहितांग ज्वर) अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलीन या प्रतिजैविकांचा औषधे म्हणून उपयोग केला जातो. डॉ.अलेक्झांडर फ्लेमिंग हे सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनीच पेनिसिलिअमया प्रतिजैविकाचा शोध लावून डॉ.अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वजण कायम त्यांच्या ऋणात राहतील यात कोणतीही शंका नाही.