उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

पाव कसा बनतो?

views

4:47
आता आपण पाव कसा बनवतात ते पाहू. पाव तयार करण्यासाठी आपल्याला मैदा, तूप किंवा तेल, मीठ, साखर, दूध, यीस्ट या सर्व साहित्याची आवश्यकता असते. प्रथम दूध गरम करावे. गरम दुधामध्ये यीस्टचे दाणे टाकावेत. थोडी साखर टाकावी. हे मिश्रण 10 मिनिट असेच ठेवून द्यावे. त्यानंतर मैदा व मीठ एकत्र चाळून घ्यावे. नंतर मैद्यामध्ये यीस्ट टाकलेले दूध मिसळून कणिक मळून घ्यावी. गरज पडली तर कोमट पाणी मिसळावे. ही कणीक ५ ते ७ मिनिटे आलटून पालटून मळून घ्यावी. कणीक एकदम मऊ होईपर्यंत मळावी. त्यानंतर कणकेला तेल लावून एका भाड्यामध्ये ठेवावे. भांडे कापडाने झाकून ठेवावे. दोन-तीन तासांनंतर पावाची ही कणीक फुलते, म्हणजेच फुगते व जवळपास दुप्पट आकाराची होते. पुन्हा ती मळून घ्यावी. त्यांनतर पावाचे साचे घेऊन ही कणीक त्या साच्यामध्ये टाकावी आणि ओवनमध्ये योग्य तापमानावर पावाची ही कणीक भाजून घ्यावी. अशा प्रकारे किण्वन प्रक्रियेने आपण पाव तयार करू शकतो.