उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

किण्व

views

3:40
आता आपण ‘किण्वन’ या प्रक्रियेविषयी माहिती घेऊया. किण्वपेशी या कवकवर्गीय आहेत. किण्वपेशी किण्वनाची क्रिया करतात. सूक्ष्मजैविक किण्वन क्रियेतून उत्तम चव किंवा गंध असलेले कार्बनी पदार्थ तयार होतात. आपल्या रोजच्या जीवनात आपण पाव, इडली असे अनेक पदार्थ आहारात घेतो. यातील बरेच पदार्थ आपण ‘आंबवतो’. त्यानंतर तो पदार्थ तयार केला जातो. उदा. पाव तयार करण्यासाठी ‘किण्व’ या प्रक्रियेची मदत होते. यीस्ट ह्या कवक वर्गीय पेशी आहेत काही पेशींना कलिका चिकटलेल्या दिसतात. म्हणजेच यीस्ट प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीने वाढतो. या ‘’अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन म्हणतात.’’ यीस्ट हे एकपेशीय कवकवर्गीय सूक्ष्मजीव आहेत. हा सूक्ष्मजीव कार्बनी पदार्थावर वाढतो. यीस्ट हा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. यीस्ट स्वत:चे पोषण करताना किण्वन करतात. म्हणजेच द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बनडायऑक्साइड वायूमध्ये करतात. यीस्ट (किण्व) हे एकपेशीय कवक असून त्यांच्या 1500 प्रजाती आहेत. यीस्टची पेशी ही दृश्यकेंद्रकी प्रकारची असते.