उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

उपद्रवी सूक्ष्मजीव

views

5:59
आता आपण उपद्रवी सूक्ष्मजीवांविषयी थोडे जाणून घेऊ या. काही सूक्ष्मजीव हे आपणास उपयोगी असतात. काही कवके उपयुक्त तर काही उपद्रवकारक असतात. त्यामुळे पदार्थांची नासाडी होते. त्वचेचे रोग होतात. तसेच काही सूक्ष्मजीव हे अपायकारकसुद्धा असतात. अशा अपायकारक सूक्ष्मजीवांनाच आपण उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणतो. हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात. पावसाळ्यात चामडी वस्तू, गोणपाट या वस्तूंवर बुरशी जमा होते. कवकांचे तंतू आणि त्यावर आलेले बीजाणू दिसतात. अशा बुरशी आलेल्या वस्तू लवकर खराब होतात. त्यामुळे हया वस्तू वापरण्यायोग्य राहत नाहीत. मात्र या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खराब होत नाहीत. कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हवेतील आर्द्रता खूप कमी असते. त्यामुळे कवक वाढत नाहीत. ओलावा मिळाल्यास हवेतील कवकाचे बीजाणू अनुकूल ठिकाणी कार्बनी पदार्थांवर रुजतात. उदा. गोणपाट, सुती कापड, चामडी वस्तू, लाकूड इत्यादींवर हे बीजाणू रुजतात. स्वतःचे अन्न मिळवून पोषण व प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो म्हणूनच बुरशी लागलेल्या कापडी वस्तू, गोणपाट, चपला, बूट, पाकिटे, पट्टे, लाकडी वस्तू यांसारख्या वस्तू जास्त काळ टिकत नाहीत.