उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

जैव उपचार

views

4:34
पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, तसेच इतर काही औदयोगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका (Yarrowia lipolytica) हे किण्व वापरले जाते. तर सॅकरोमायसिस सेरेविसी हे किण्व अर्सेनिक ह्या प्रदूषकाचे शोषण करून घेते. Alcanyvorax जीवाणूंचा वापर समुद्रामध्ये तेलगळती स्वच्छ करण्यासाठी होतो.आपण आजारी पडतो तेव्हा बरे होण्यासाठी डॉक्टर आपल्याला औषधी गोळ्या देतात. या गोळ्यांमध्ये प्रतिजैविके वापरली जातात. शिवाय पिकांवरील रोग किंवा किडी नाहीशा करण्यासाठीही प्रतिजैविकांचा वापर केला जातो. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत. विसाव्या शतकात तर प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांमध्ये खूप क्रांती झाली आहे. अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. क्षयरोग, विषमज्वर, पोलिओ अशा अनेक रोगांवर यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. क्षयरोग तर काही देशांतून समूळ नष्ट झाला आहे. प्रतिजैविके आदिजीवांना नष्ट करू शकतात. प्रतिजैविके दोन प्रकारची असतात: विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके.