उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

जरा डोके चालवा

views

3:19
दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय जीवाणू जास्त प्रमाणात असतात. विरजणात ’लॅक्टोबॅसिलाय’ हे जीवाणू असतात. हे जीवाणू दुधाच्या घटकांत बदल घडवून आणतात. दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लात रुपांतर करतात. त्यामुळे दुधाचा सामू (PH) कमी होऊन दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. क्लथन म्हणजे साकळने, घट्ट होणे. दुधाचे दही बनताना ते घट्ट होते. त्याला क्लथन म्हणतात. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात आणि दुधाचे दह्यात रूपांतर होते. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. तर सामू कमी असल्याने दुधातील घातक जीवाणूंचा नाश होतो.