भारतापुढील अंतर्गत आव्हाने

प्रस्तावना

views

3:57
भारताच्या अंतर्गत भागांतही काही आव्हाने होती. उदा. फुटीरतावाद्दी चळवळी, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद यांसारख्या आव्हानांचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत. पंजाबमधील असंतोष :- पंजाब राज्यात ‘अकाली दल’ हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने ‘आनंदपूर साहिब’ ठराव मंजूर केला. या ठरावानुसार चंडीगढ पंजाबला द्यावे. इतर राज्यांतील पंजाबी भाषा बोलणारे प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबी लोकांची संख्या वाढवावी, पंजाब राज्यास अधिक स्वायत्ता म्हणजे स्वतंत्रता व सत्ता द्यावी. अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती. १९७७ मध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता आपल्या हाती घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्यावे, व ‘अमृतसर’ या शहराला ‘पवित्र शहर’ हा किताब द्यावा, अशा मागण्या केल्या. वरील सर्व मागण्या ‘आनंदपूर साहिब’ या ठरावात होत्या. पंजाबमधील लोकांना व अकाली दलाला शीख लोकांचे स्वतंत्र राष्ट्र ‘खलिस्तान हवे होते. त्यामुळे १९८० मध्ये पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले. या चळवळीला पाकिस्तानचा पाठिंबा होता. या काळात अकाली दल पक्षाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना सरकार विरुद्ध निदर्शने करण्याच्या सूचना देत होते. सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस खलिस्तान व्हावा अशी तीव्र इच्छा असणारे खलिस्तानवादी जर्नलसिंग भिंद्रानवाले यांच्याभोवती त्यांचे सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरूवात झाली.