भारतापुढील अंतर्गत आव्हाने

प्रदेशवाद

views

4:05
प्रदेशवाद :- प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. उदा. मी बंगाली, मी मराठी, मी गुजराती इ. वरीलप्रमाणे आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी, मी गुजराती म्हणून इतर प्रांतातील लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आपलेपणाला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे पण त्याचे विकृतीकरण नसावे. प्रदेशा-प्रदेशातील विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. प्रदेशवाद वाढीस लागतो. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास साधताना काही राज्यांची आर्थिक प्रगती अधिक झाली तर काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या मागासच राहिले. उदा. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या बरीच विकसित झाली. तर याउलट ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्ये आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यांत आर्थिक विकास होतो, ती राज्ये इतर क्षेत्रांतही प्रगती साधू शकतात. उदा. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, मूलभूत सुविधा इ.चा विकास होऊ शकतो. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यांना व तेथील लोकांना ज्या विकासाच्या संधी उपलब्ध होतात, त्या अशा राज्यांना मिळत नाहीत.