भारतापुढील अंतर्गत आव्हाने

अरुणाचल प्रदेश

views

4:26
अरुणाचल प्रदेश :- भारताचे अति पूर्वेकडील घटकराज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे. जसे जगाचा विचार केला तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. म्हणजेच पृथ्वीवर सर्वप्रथम सूर्यकिरणे जपानच्या भूमीवर पडतात. त्याचप्रमाणे भारतातील उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून अरुणाचल प्रदेशला ओळखले जाते. १९५४ मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली, त्याला १९७२ साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. २० फेब्रुवारी १९८७ रोजी या भागास म्हणजे अरुणाचल प्रदेशास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. १९६० ते २००० या कालखंडातील ईशान्य भारताचा इतिहास पाहता या ठिकाणी लोकशाही वाढण्यास व रुजण्यास सुरूवात झाली. केंद्र सरकारने या प्रदेशाचा विकास होण्यासाठी विविध योजना चालू केल्या, औद्योगीकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.