भारतापुढील अंतर्गत आव्हाने Go Back ईशान्य भारत समस्या views 2:26 ईशान्य भारत समस्या:- ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर ईशान्येकडील आठ राज्ये येतात. म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांचा समावेश यात होतो. या राज्यांना नेपाल, भूटान या देशांच्या सीमा आहेत. तर मेघालय, त्रिपुरा, आसामला बांग्लादेशच्या सीमा लागून आहेत तर नागालँड, मणिपूर, मिझोराम यांसारख्या राज्यांना म्यानमारच्या सीमा लागून आहेत. या राज्यांमध्ये वंश, भाषा व सांस्कृतिक विविधता यांमध्ये वेगळेपणा दिसून येतो. या भागातील विविध जमातींतील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला. १९५४ मध्ये त्यांनी नेफा (NEFA) म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर एजन्सी असा भाग निर्माण केला. यामध्ये भारत – चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजाती असणाऱ्या प्रदेशांचा समावेश होतो. या भागात असणाऱ्या विविध जमातींचा विकास करताना त्यांची संस्कृती जपली जाईल अशी काळजी घेण्याची तरतूद नेहरूंनी केली. संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतूद करण्यात आली आहे. १९६५ मध्ये त्याची जवाबदारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपविण्यात आली. ईशान्येकडील या प्रदेशांना भारतातील इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी १९७१ मध्ये ‘ईशान्यीय परिषद कायदा’ करण्यात आला. प्रस्तावना ऑपरेशन ब्लू स्टार ईशान्य भारत समस्या मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश जमातवाद प्रदेशवाद