भारतापुढील अंतर्गत आव्हाने

नागालँड

views

3:39
नागालँड :- आता आपण नागालँड हे स्वतंत्र राज्य कसे निर्माण झाले याची माहिती घेऊ. ईशान्य भारतातील ‘नागा’ जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमार देशाचा सीमवर्ती भाग अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती. १९४६ मध्ये काही सुशिक्षित शिकलेल्या नागा जमातीतील काही युवकांनी ‘नागा नॅशनल कौन्सिल (NNC) या संघटनेची स्थापना केली. त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिझो हे करत होते. ही पहिली फुटीरवादी नागा संस्था होय. यांनी पुढे स्वतंत्र ‘नागालँड’ या राज्याची नव्हे तर देशाची मागणी केली. पुढे या संघटनेने १९५४ मध्ये नागालँडच्या स्वतंत्र संघ राज्याच्या स्थापनेची घोषणा केली. पुढे १९५५ मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक व स्थानिक लोक यांच्यात चकमकी उडाल्या. या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. या सर्व बाबींवर केंद्र सरकार व एनएनसी यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या. केंद्र सरकारने नागांची संस्था जास्त असणाऱ्या भागाला केंद्रशासित दर्जा देण्याचे ठरवले. अखेर नेफा मधील नागबहुल भाग व त्सुएनसाँगचा भाग एकत्र करून १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.