भारतापुढील अंतर्गत आव्हाने

ऑपरेशन ब्लू स्टार

views

2:43
ऑपरेशन ब्लू स्टार:- विशिष्ट उद्द्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ’ऑपरेशन’ म्हणतात. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे सुवर्णमंदिरात लपलेल्या दहशतवादयांना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई होय. ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्याकडे सोपविली होती. ३ जूनपासूनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चेबांधणी सुरू केली होती. आजूबाजूच्या काही इमारती ताब्यात घेऊन त्यावर मशिनगन्स बसविल्या गेल्या. ३ जूनपासून सुवर्ण मंदिराच्या परिसरात संचारबंदी लागू केली. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला तिकडे जाण्यास मनाई करण्यात आली. ३ जूनपासून ५ जून पर्यंत दोन्हीकडून अधूनमधून काही फेरी झाडण्यात आल्या. मुख्य कारवाईस सुरवात सुवर्ण मंदिरात ५ जूनला रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाली. दहशतवाद्यांनी दरवाजे आणि खिडक्यांवर वाळूने भरलेली पोती लावली होती. त्यामुळे त्यांच्यावर सरळ गोळीबार करता येत नव्हता. अनेक प्रयत्न करून मंदिरातील दहशतवाद्यांपर्यत पोहचता येत नव्हते. त्यामुळे जनरल ब्रार यांनी वरिष्ठांकडे रणगाड्यांचा वापर करण्याची परवानगी मागितली व ती मिळाली. रणगाड्यांतून अकाल तख्त वर मारा करण्यात आला जो यशस्वी ठरला. यानंतर रात्री १ वाजण्याच्या (६ जूनच्या सकाळी) सुमारास काही जण पांढरे निशाण फडकावून बाहेर आले तेव्हा सैन्याला कारवाई यशस्वी झाल्याचा अंदाज आला. नंतर अकाल तख्तमध्ये घुसून भिंद्रानवाले व त्यांचे सहकारी या दहशतवादयांची ओळख पटवून त्यांची प्रेते ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर ही कारवाई संपली. ३ जून ते ६ जून १९८४ पर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑपरेशन चालू होते.