वास्तव संख्या Go Back करणी views 5:30 आता आपण करणी या विषयी जाणून घेवून त्यावर आधारित उदाहरणे सोडवून पाहू. पहा मुलांनो; आपल्याला माहित आहे की, 5 ही परिमेय संख्या आहे. परंतू √5 ही संख्या परिमेय नाही. ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. त्याचप्रमाणे n वे मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. 1) जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णाक संख्या असेल आणि a या धन वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले तर xn = a किंवा √(n&a) = x असे लिहतात. 2) जर a ही धन परिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल, तर x ही करणी (अपरिमेय मूळ) आहे म्हणतात. 3) √(n&a) ही करणी संख्या असेल तर √‘ या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात. n या संख्येला त्या करणीची कोटी म्हणतात आणि a ला करणीस्थ संख्या असे म्हणतात. सजातीय करणी: √2, -3√2, ( 4)/5 √2, या काही सजातीय करणी आहेत. जर p आणि q या परिमेय संख्या असतील तर P√a, q√a या सजातीय करणी आहेत असे म्हणतात. दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. प्रस्तावना अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/q या रुपात मांडणे संख्यारेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या व वास्तव संख्या अपरिमेय संख्याची दशांश रुपात मांडणी संख्या π पाय अपरिमेय संख्याचे गुणधर्म करणी करणीची तुलना सजातीय करणींवरील क्रिया करणीचे परिमेयीकरण छेदाचे परिमेयीकरण