ध्वनी: ध्वनीची निर्मिती

ध्वनी कसा ऐकू येतो?

views

3:58
ध्वनी निर्मिती कशी होते आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहचते हे समजण्यासाठी एक प्रयोग करून बघू. साहित्य :- पाणी, भांडे, चमचा. कृती :- एक खोलगट आणि पसरट भांडे (टोप) घ्या. ते पूर्ण पाण्याने भरा. नंतर पाण्याने भरलेल्या या भांड्याच्या कडेवर चमचाने आघात करा. हे करून झाल्यावर तुम्हांला काय दिसते, ते सांगा. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे ‘कंपन’ होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो. ज्या वस्तूंमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला ध्वनी ‘स्त्रोत’ म्हणतात. ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते. जेव्हा ध्वनी स्त्रोताचे कंपन होवू लागते, तेव्हा त्याच्या लगतच्या हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्त्रोतांपासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनीलहर म्हणतात. या ध्वनीलहरी आपल्या कानांपर्यंत पोहचतात. आपल्या कानांतील पाकळीत नाजूक पडदा असतो. तो पडदा कंपन पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानांतील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो.