ध्वनी: ध्वनीची निर्मिती

दोलकांची लांबी आणि वारंवारिता

views

4:54
आपण दोलक, दोलन व दोलनगती बघितली. प्रत्येक क्रिया घडविण्यासाठी काही वेळ हा लागतोच. तसेच दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलनकाल असे म्हणतात. आपण दोलनाच्या आयामाची जी आकृती बघितली त्या आकृतीतील दोलक हा (B) या ताणलेल्या स्थितीपासून (A) या मूळ स्थितीकडे जातो व तेथून (C) या स्थितीकडे व परत (A) कडे जातो. (A) कडून तो पुन्हा (B) या स्थितीकडे येतो. म्हणजेच त्या दोलकाला (B-A-C-A-B) हे अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळेला आपण दोलकाचा दोलनकाळ म्हणू शकतो. दोलकाचा दोलनकाल हा (T) असा दर्शवितात. तसेच दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलनसंख्येला दोलकाची वारंवारिता म्हणतात. मागील आकृतीत (B-A-C-A-B) हे एकूण अंतर म्हणजे एक दोलन होय. म्हणून वारंवारिता (n) = 1/(दोलकाच दोलनकाळ (T)) =1/( (T)) एका सेकंदात किती दोलने झाली यांचे एकक वारंवारिता आहे. उदा. झोपाळा किंवा लोखंडी किंवा लाकडी गोळा हा एका सेकंदात किती वेळा एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत जावून पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो. त्याला ह्या झोपाळ्याची किंवा गोळ्यांची वारंवारिता म्हणतात. वारंवारिता ही हार्टझमध्ये (Hz) व्यक्त करतात. उदा. 1 Hz म्हणजे एका सेकंदात एक दोलन. म्हणून 100 Hz म्हणजे एका सेकंदात 100 दोलने होय.