ध्वनी: ध्वनीची निर्मिती

ध्वनीची उच्चनीचता

views

3:44
ध्वनीची उच्चनीचता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आता आपण एक प्रयोग करूया. प्रथम 80 ते 90 सेमी लांब व 5 सेमी रूंद अशी एक लाकडाची फळी घ्या. त्यावर दोन्ही टोकांकडून काही सेमी सोडून दोन खिळे हातोडीच्या साहाय्याने ठोका. नंतर एक बारीक तार घेवून तिचे एक टोक फळीवरच्या एका टोकापासून दुसऱ्याटोकांपर्यंत ताणून पक्की बांधा. आता खिळ्याजवळ तारेखाली दोन्ही बाजूंनी लाकडी किंवा प्लॉस्टिकचा एक एक त्रिकोणी ठोकळा सरकवा व नंतर हलकेच तार छेडा. लाकडाचे २–3 छोटे चौकोनी ठोकळे एका बाजूच्या त्रिकोणी ठोकळयाखाली असे सरकावा, की तारेच्या लांबीत काहीही फरक पडणार नाही. आता बोटाच्या साहाय्याने तारेला छेडा. तारेला छेडून झाल्यावर त्यातून निर्माण होणारा ध्वनी ऐका. तसेच तारेचे होणारे कंपनही पहा. हे निरीक्षण करत असताना कंपनाच्या वारांवारीतेमध्ये काय फरक आढळतो यांची नोंद करा नि सांगा आपल्या असे लक्षात येते की, तारेचा ताण वाढवला तर वारंवारिता वाढते व ताण कमी केला तर वारंवारिता कमी होते. ज्यावेळी तारेचा ताण वाढलेला असतो त्यावेळी येणारा ध्वनी हा उच्च असतो, तर ताण कमी केला असता तो नीचतम असतो. याला ध्वनीची उच्च नीचता असे म्हणतात.