ध्वनी: ध्वनीची निर्मिती

पट्टीची दोलने व त्यापासून निर्माण होणारा ध्वनी

views

3:28
आपण पट्टीची दोलने व त्यापासून निर्माण होणारा ध्वनी कसा तयार होतो. प्रथम एक प्लास्टिकची मोजपट्टी घेवून ती टेबलावर अशी दाबून धरा, की जेणे करून पट्टीचा बराचसा भाग टेबलाच्या बाहेर राहील. आता तुमच्या मित्राला पट्टीचा मोकळा भाग म्हणजेच टेबलाबाहेरील भाग खालच्या दिशेने दाबून सोडण्यास सांगा. पहिल्या निरीक्षणात आपण 20 सेमी पट्टी बाहेर ठेवली तर आवाज खूप कमी ऐकू आला. तसेच कंपनाची वारंवारिता ही फार कमी दिसून आली. आता ही पट्टी 10 सेमी आत घेवून पुन्हा तीच कृती करा जर पट्टी टेबलावर उभी धरून ठेवली तर तिच्यात कंपनेही तयार होणार नाहीत. आणि त्यातून कोणत्याही प्रकारचा आवाजही आपल्याला ऐकू येणार नाही. तसेच आपण जर पट्टी आडवी करून पट्टीचा जास्त भाग टेबलावर ठेवला आणि फार कमी भाग टेबलाच्या बाहेर ठेवला तर कंपनेही निर्माण होणार नाहीत आणि ध्वनीही निर्माण होणार नाही. परंतु आपण जर पट्टीचा काही भाग टेबलावर व काही भाग म्हणजे ठराविक भाग टेबलाच्या बाहेर ठेवला तर पट्टीचे कंपने निर्माण होवून ध्वनी ऐकायला येईल. यावरून असे लक्षात येते की, पट्टी टेबलावर कशीही ठेवली तर ध्वनी निर्माण होत नाही.