ध्वनी: ध्वनीची निर्मिती

ध्वनीची तीव्रता – ध्वनीची पातळी

views

3:35
ध्वनीची तीव्रता आणि ध्वनीची पातळी हया दोन वेगवेगळ्या राशी आहेत. हया दोन्ही राशी ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी वापरतात. तसेच ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते. मुलांनो, ध्वनीपातळी ही ‘डेसिबेल’ या एककात मोजतात. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणिती सूत्राने ‘डेसिबेल’ हया ध्वनीच्या पातळीचे परिणाम काढता येते. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वनी पातळी ‘डेसिबेल(dB)’ मध्ये सांगतात. उदाहरणार्थ ध्वनीची तीव्रता दहा पटींनी वाढते तेव्हा ध्वनीपातळी 10 dB ने वाढते. आपलं आपापसात कुजबुजणे, श्वासोच्छवास घेणे, ठराविक अंतरावरून एकमेकांशी बोलणे, जास्त तीव्र आवाजाने कानठाळया बसणे हया वेगवेगळ्या ध्वनीपातळीवर होणाऱ्या क्रिया आहेत. काही आवाज खूप मोठे असल्याने थोड्यावेळासाठी जरी तो आवाज ऐकला तरी बहिरेपणा जाणवतो. म्हणूनच आता आपण खालील प्रमाणे वेगवेगळ्या ध्वनीपातळी पाहूया.