ध्वनी: ध्वनीची निर्मिती

श्राव्य ध्वनी

views

3:09
आपण ऐकू शकणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 20Hz ते 20,000Hz या दरम्यान असते. आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो. म्हणून 20Hz ते 20,000Hz वारंवारिता असलेल्या ध्वनीला ‘श्राव्य ध्वनी’ असे म्हणतात. ज्या ध्वनीची वारंवारिता 20Hz पेक्षा कमी असते असा ध्वनी आपणांस ऐकू येत नाही. म्हणूनच 20Hz पेक्षा कमी वारंवारिता असलेल्या ध्वनीला ‘अवश्राव्य ध्वनी’ असे म्हणतात. उदा. आपल्या दोन्ही हातांची होणारी हालचाल, ओठांची होणारी हालचाल, तसेच झाडांवरून पाने गळून पडताना होणारी हालचाल या क्रियांचा आवाज आपल्याला ऐकला येत नाही. 20Hz पेक्षा कमी वारांवारीतेचे ध्वनी व्हेल मासे, हत्ती, पाणघोडा, गेंडा हे प्राणी काढू शकतात आणि ऐकूही शकतात.