ध्वनी: ध्वनीची निर्मिती

दोलक, दोलन व दोलनगती

views

4:59
ध्वनी निर्माण करणाऱ्या कंपनाचा अभ्यास एका साध्या ‘दोलका’ च्या सहाय्याने कसा करता येतो ते आपण पाहू. जेव्हा झुलणारा हा झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते, असे म्हणतात. तसेच मध्यस्थिती मधून पुन्हा-पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलनगती होय. अशी दोलनगती आपल्याला हृदयाची धडधड, दोलक असणारे घड्याळ यात आढळून येते. आपण रबरबँडच्या कंपनाच्या स्थितीची तुलना बाजूच्या आकृतीशी केली तर आपल्या असे लक्षात येते की, जेव्हा रबराच्या मूळ स्थितीपासून (A) रबर ताणले जाते, तेव्हा ते (B)या स्थितीत येते. रबर यावेळी वक्र स्थितीत येते. मूळ स्थितीपासून म्हणजेच (A) पासून रबर ताणल्यानंतर (B) पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच कंपनाचा आयाम असे म्हणतात. जेव्हा रबरावर जास्त बल लावतो, तेव्हा ते जास्त ताणले जाते म्हणजेच त्यावेळी आयाम वाढतो. सोडून दिल्यावर अशा रबराचा मोठा आवाज येतो. रबरावर कमी बल लावले की रबर कमी ताणले जाते अशावेळी रबराचा आवाजही कमी येतो. म्हणजेच कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूंच्या मध्यस्थिती पासून कोणत्याही एकाच बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा आयाम असे म्हणतात.