ध्वनी: ध्वनीची निर्मिती

श्राव्यातीत ध्वनी/ स्वनातीत ध्वनी

views

4:29
आतापर्यंत आपण मनुष्य व प्राणी हे काही ध्वनी ऐकू शकतात तर काही ध्वनी ऐकू शकत नाही असे ध्वनीचे प्रकार बघितले. परंतु आता आपण हा ध्वनी काही प्राण्यांना ऐकू येतो पण मनुष्य हा ध्वनी ऐकू शकत नाही, अशा श्राव्यातीत ध्वनी/ स्वनातीत ध्वनीचा अभ्यास करूया. 20,000Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी/ स्वनातीत ध्वनी असे म्हणतात. हे श्राव्यातीत ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. कुत्रा, मांजर, डॉल्फिन, सी –लायन आणि वटवाघुळे यांसारखे प्राणी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अवश्राव्या ध्वनीद्वारे 10 किमी अंतरापर्यंत हत्ती एकमेकांशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कुत्री व इतर काही प्राण्यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल श्राव्यातीत ध्वनीद्वारे लागते असाही एक समज आहे. श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग मानवाने अनेक उपकरणात आणि तंत्रज्ञानात करून घेतला आहे.