पर्यावरणीय व्यवस्थापन

परिसंस्था

views

4:23
आपण परिसंस्थेविषयी माहिती घेऊ. परिसंस्थेमधील प्रत्येक घटक हा आपापली जबाबदारी पार पाडत असतो. कारण जैविक व अजैविक घटक व त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था तयार होत असते. वनस्पती ह्या अन्ननिर्मिती करतात. हरिण, उंट, गाय, म्हशी असे शाकाहारी प्राणी हे वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. तर या शाकाहारी प्राण्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढू न देण्यासाठी वाघ, सिंह अशा मांसाहारी प्राण्यांची मदत होते. वाळवी, अळ्या असे जीवजंतू हे घाणेरड्या ठिकाणी आढळून येतात. हे जीवजंतू निसर्गाची साफसफाई करतात. त्यामुळे परिसंस्थेमध्ये हे घटकही खूप महत्त्वाचे असतात. आपल्या पर्यावरणाचे संतुलन या घटकांमुळे योग्य राहते. म्हणून आपण सर्वांनी सर्व घटकांची काळजी घेतली पाहिजे.