पर्यावरणीय व्यवस्थापन

पर्यावरणीय प्रदूषण

views

6:26
“सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीच एक प्रमुख समस्या आहे. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना किंवा मानवाच्या कृतीमुळे आजूबाजूच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय. अशा प्रदूषणामुळे हवा, पाणी, जमीन, यांच्या भौतिक व रासायनिक तसेच जैविक गुणधर्मांवर वाईट परिणाम घडून येतात. तसेच मानव व इतर सजीवांवरही याचा घातक परिणाम होत असतो. लोकसंख्येची भरमसाठ वाढ, औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनाचा मोठ्या प्रमाणात वापर, जंगलतोड, व वाढते नागरिकरण यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषण घडून येते.