पर्यावरणीय व्यवस्थापन

एका लहान माणसाची मोठी गोष्ट

views

4:29
आता आपण एका पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची गोष्ट पाहूया. 1963 मध्ये आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जादव मोलाई पयांग नावाच्या एका कर्तबगार व्यक्तीचा जन्म झाला. तो वयाच्या 16 व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करत होता. एके दिवशी त्याच्या गावाजवळून वाहणाऱ्या ब्रम्हपूत्रा नदीला पूर आला. त्यामुळे खूप साप मरण पावले. यावर उपाय म्हणून त्याने सर्वप्रथम 20 बांबूची रोपटे लावली. त्यानंतर 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्याभागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल इतर कामगारांप्रमाणे मोलाईही करीत होते. मात्र ही योजना थांबल्यानंतरही या माणसाने त्याचे काम चालूच ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे ज्या भागात एकही वृक्ष नव्हता त्या भागात जवळपास 1360 एकरचे जंगल मोलाईने तयार केले. आसाममध्ये असणाऱ्या ‘जोरहाट’ येथील कोकीलामुख येथे हे जंगल 30 वर्षांच्या अथक परिश्रमाने तयार केल्यामुळे भारत सरकारने मोलाई यांना ‘पद्मश्री’ या किताबाने सन्मानित केले. आज हे जंगल ‘मोलाई जंगल’ म्हणून ओळखले जाते. आज माणसे जंगले नष्ट करत आहेत. पण एका जरी माणसाने मनात आणले तर त्याला अख्खे जंगल तयार करता येते हे मोलाई यांनी जगाला दाखवून दिले आहे.