पर्यावरणीय व्यवस्थापन

धोक्यात आलेली देशातील तीन वारसास्थळे

views

4:11
आता आपण आपल्या देशातील धोक्यात आलेल्या तीन वारसास्थळांविषयी माहिती घेऊया. 1) पश्चिम घाट: पश्चिम घाटाची व्याप्ती ही महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या पाच राज्यात आहे. खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी पश्चिमघाटात विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे पश्चिम घाटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे व तेथे आढळून येणाऱ्या आशियाई सिंह व रानगवे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 2) मानस अभयारण्य: मानस अभयारण्य हे आसाम या राज्यात आहे. या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर, यांचा फटका बसलेला आहे. त्यामुळे तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 3) सुंदरबन अभयारण्य: पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघासाठी राखीव क्षेत्र आहे. मात्र धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेल्या चरांमुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कालांतराने हे वाघ या क्षेत्रातून नष्ट होतील की काय अशी भीती वाटत आहे.