पर्यावरणीय व्यवस्थापन

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपाय

views

4:46
आता आपण जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ते समजून घेऊ. 1)ज्या दुर्मीळ जातींचे सजीव आहेत त्या सजीवांचे संरक्षण केले पाहीजे. 2) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे खूप जरुरी आहे. 3)ज्या क्षेत्रात जास्त प्रमाणात सजीव आहेत ते क्षेत्र ‘राखीव जैवविभाग’ म्हणून घोषित करणे. 4) ज्या जाती दुर्मीळ होत आहेत त्या प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 6) पर्यावरणासंबंधीचे जे कायदे आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे. 7) जैवविविधतेसंबंधी पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. अशा प्रकारच्या उपाययोजना करून आपण जैवविविधतेचे संवर्धन योग्य प्रकारे करू शकतो. आता हे चित्र पाहा. यात काही चिन्हांचे संकेत दिले आहेत.